Rain update Maharashtra गेल्या दोन-तीन दिवसांत महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची नोंद झाली आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर राज्याच्या काही भागात मुसळधार पाऊस झाला. काही ठिकाणी ढगफुटीसारखा पाऊस झाल्याची नोंद आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे पुन्हा एकदा नुकसान झाले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे आज दीपोत्सवाच्या शेवटच्या दिवशी अर्थातच भाऊबिजेच्या दिवशीही महाराष्ट्रात पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज भाऊबिजेला महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यांत पाऊस पडण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांमध्ये अत्यंत किरकोळ पाऊस पडेल, असा अंदाज आहे.Rain update Maharashtra
“मॉन्सूनोत्तर पावसाचा राज्यात धुमाकूळ”
मात्र, राज्यातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये हवामान प्रामुख्याने कोरडे राहील आणि त्या भागात थंडीची तीव्रता हळूहळू वाढेल. एकूणच आज महाराष्ट्रात संमिश्र हवामान पाहायला मिळणार आहे.
काही ठिकाणी गारपीट तर काही ठिकाणी पाऊस पडेल. भारतीय हवामान खात्याने आपल्या ताज्या बुलेटिनमध्ये दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, पुण्यासह उत्तर महाराष्ट्रात आज हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.
मात्र रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड या १२ जिल्ह्यांत ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता आहे. राज्यातील उर्वरित 24 जिल्ह्यांमध्ये केवळ स्वच्छ वातावरण जाणवणार आहे.Rain update Maharashtra
सरकारकडून देशातील ‘या’ नागरिकांना मिळणार दरमहा 1000 रुपये, 6 महिने लाभ मिळणार
हवामान प्रामुख्याने कोरडे राहील, असे हवामान खात्याने सांगितले. दरम्यान, नोव्हेंबर महिना सुरू होऊनही ऑक्टोबर हिट येत आहेत. त्यामुळे ऑक्टोबर हीटपासून दिलासा कधी मिळणार, तापमान कधी कमी होणार आणि थंडी कधी सुरू होणार हा मोठा प्रश्न आहे.
दरम्यान, पाऊस ओसरल्यानंतर महाराष्ट्रात थंडी जाणवेल, असे भारतीय हवामान खात्याने म्हटले आहे. सध्या पश्चिम महाराष्ट्रात काहीशी थंडी आहे. तेथील वातावरणात गारवा निर्माण होत आहे.उत्तर महाराष्ट्र आणि कोकणातही कमाल तापमानात घट झाली आहे. आता पाऊस पडण्याची शक्यता आहे.Rain update Maharashtra