Gharkul scheme ; केंद्र आणि राज्य सरकार कडून घरकुल योजना राबवली जात आहेत. गोरगरीब लोकांना स्वतःचे पक्के घर असावे यासाठी वेगवेगळ्या योजनांची अंमलबजावणी करून घरासाठी आर्थिक मदत केली जात आहे. 2025 मध्ये घरकुलाचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रे कोणती लागतात अनुदान किती मिळते आणि लाभार्थी पात्रता काय आहे आणि ऑफलाईन व ऑनलाईन अर्ज कसा करावा याबद्दल माहिती पाहुयात.
घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी हि कागदपत्रे आवश्यक
आधार कार्ड, राशन कार्ड, ग्रामपंचायत रहिवासी प्रमाणपत्र, जॉब कार्ड, बॅंक पासबुक, उत्पन्न प्रमाणपत्र, पासपोर्ट फोटो इत्यादी कागदपत्रे बंधनकारक आहे. याव्यतिरिक्त तुम्हाला आणखी काही कागदपत्रांची मागणी होऊ शकते.
लाडकी लेक योजना; मुलींना मिळत आहेत 1 लाख रुपये, लगेच या योजनेचा अर्ज करा ladki lek Yojana
घरकुल योजनेत 2025 मध्ये किती अनुदान मिळते
घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी चालू वर्षात (2025) मध्ये एक लाख 20 हजार रुपये एवढे अनुदान दिले जात आहे. राज्य सरकारने केंद्र सरकारकडे हे अनुदान वाढवण्यासाठी प्रस्ताव सादर केला आहेत. परंतु अद्याप त्याबद्दल काही निर्णय झाला नाहीत. सध्या घरकुल लाभार्थ्यांना 1,20,000 एवढे अनुदान दिले जातेय.
घरकुलांसाठी अर्ज कसा करावा
घरकुलांसाठी ग्रामपंचायत मध्ये ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येतोय. ग्रामपंचायत अर्ज स्विकारत नसेल तर ऑनलाईन अर्ज सुद्धा करता येतो. ऑनलाईन अर्ज कसा करावा याबाबत संपूर्ण माहिती खालील YouTube video मध्ये पहावा…