Ladki Bahin Yojana मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण
मुंबई, (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Scheme) योजनेत मोठी कारवाई करत तब्बल ५ लाख महिलांची नावे वगळलेली आहे. राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी ही योजना आणलेली होती, परंतु सत्तांतरानंतर योजनेच्या लाभार्थी महिलांची पडताळणी सुरू करण्यात आलेली आहे.
आदिती तटकरे यांनी ट्विटद्वारे या कारवाईची माहिती दिलेली. त्यांनी सांगितले की, दिनांक २८ जून २०२४ आणि ३ जुलै २०२४ रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र महिलांना योजनेतून वगळण्यात आलेले आहेत. या निर्णयामुळे अनेक महिलांना मोठा धक्का बसला आहेत. तटकरे यांनी अपात्र ठरलेल्या महिलांची आकडेवारी आणि कारणेही जाहीर केलेली.
लाडकी लेक योजना; मुलींना मिळत आहेत 1 लाख रुपये, लगेच या योजनेचा अर्ज करा ladki lek Yojana
नावं वगळण्याचं कारण आणि महिलांची संख्या:
६५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या महिला: १,१०,०००
कुटुंबात चारचाकी वाहन असलेल्या, नमोशक्ती योजनेचा लाभ घेणाऱ्या आणि स्वेच्छेने नाव मागे घेणाऱ्या महिला: १,६०,०००
अशाप्रकारे एकूण ५ लाख महिलांना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतून वगळण्यात आलेले आहेत.
दोन योजनांचा लाभ आणि घरी चारचाकी-
कारवाईमागचे कारण स्पष्ट करण्यात आलेले आहे. यामध्ये अनेक महिला 2 योजनांचा लाभ घेत होत्या, तर काहींच्या कुटुंबांकडे चारचाकी गाड्या होत्या. त्यामुळे, नियमांनुसार या महिला योजनेसाठी अपात्र ठरत होत्या. पडताळणीत अपात्र आढळलेल्या महिलांना योजनेतून वगळण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहेत.
मंत्री आदिती तटकरे यांनी हे देखील स्पष्ट केले की, “सर्व पात्र महिलांना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहेत.” या कारवाईमुळे गरजू आणि पात्र महिलांपर्यंत योजनेचा लाभ पोहोचण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहेत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना !
दिनांक २८ जून २०२४ व दिनांक ३ जुलै २०२४ रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेतून वगळण्यात येत आहेत.
अपात्र ठरविण्यात आलेल्या लाभार्थ्यांचे विवरण खालील प्रमाणे :