Cotton Rate गेल्या दोन वर्षांपासून नगदी पीक असलेल्या कापसाला बाजारात अपेक्षित भाव मिळत नाही. गतवर्षी अर्थातच 2023 च्या खरीप हंगामात उत्पादन झालेल्या कापसालाही अपेक्षित भाव मिळाला नाही.
त्यावेळी परिस्थिती इतकी भीषण बनली की राज्य सरकारला कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अनुदान जाहीर करावे लागले. गतवर्षी उत्पादित झालेल्या कापसाच्या भरपाईपोटी शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम मिळाली आहे.
यावर्षी कापसाला चांगला भाव मिळण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र यंदा हंगामाच्या सुरुवातीलाच कापसाच्या दरावर दबाव आहे. यामुळे शेतकरी नाराज असून पिकासाठी झालेला खर्च कसा भागवायचा हा मोठा प्रश्न आहे.
लाडकी बहीण पुढील हप्ता नोव्हेंबरमध्ये, मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
दिवाळीच्या काळात राज्यातील अनेक बाजारपेठेत कापसाच्या दरावर दबाव आला आहे. दिवाळीत जेथे लिलाव झाले, तेथे कापसाच्या भावावर कमालीचा दबाव होता. दरम्यान, दिवाळीनंतर काल 4 नोव्हेंबर 2024 रोजी झालेल्या लिलावात राज्यातील विदर्भ विभागातील वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला सर्वाधिक भाव मिळाल्याचे वृत्त आहे.Cotton Rate
महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, वर्धा एपीएमसीमध्ये काल झालेल्या लिलावात कापसाला सर्वाधिक ७,२०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.
या बाजारात कापसाला किमान 6800 रुपये तर सरासरी 7000 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. दरम्यान, आता राज्यातील इतर बाजारपेठेतील कापसाचे बाजारभाव थोडक्यात जाणून घेणार आहोत.
राज्यातील प्रमुख बाजारपेठेत कापसाचे भाव काय होते? Cotton Rate
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
05/11/2024 | ||||||
नंदूरबार | — | क्विंटल | 80 | 6400 | 7175 | 6850 |
किनवट | — | क्विंटल | 58 | 6450 | 6600 | 6525 |
उमरेड | लोकल | क्विंटल | 1102 | 6750 | 7000 | 6810 |