e-Shram Portal Registration : केंद्र सरकारच्या ई-श्रम पोर्टलवर असंघटित क्षेत्रातील ३०.५८ कोटी कामगार आता नोंदणीकृत आहेत. अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास तुम्हाला सरकारकडून मदत मिळत आहे.
e-Shram Portal Registration : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना गीग कामगारांसाठी मोठी घोषणा केलेली होती. तासिका किंवा रोजंदारीवर काम करणाऱ्या गीग वर्कर्ससाठी ई-श्रम पोर्टलवर नोंदणीची सुविधा देण्यात आलेली आहे.
याचा फायदा सुमारे १ कोटी कामगारांना होणार आहे. गीग कामगारांच्या श्रेणीमध्ये सेल्समन/हेल्पर, ऑटो चालक, ड्रायव्हर, पंक्चर दुरुस्ती करणारे, मेंढपाळ, दुग्ध उत्पादक शेतकरी, सर्व पशुपालक, पेपर विक्रेते, डिलिव्हरी बॉय, वीटभट्ट्यांवर काम करणारे मजूर इत्यादींचा समावेश आहेत. याची नोंदणी कशी करायची? आणि त्याचा काय फायदा होणार? याची माहिती घेऊयात.
अधिकृत वेबसाईट: https://eshram.gov.in/
ई-श्रम पोर्टलवर नोंदणीचे फायदे काय?
केंद्र सरकारच्या ई-श्रम पोर्टलवर असंघटित क्षेत्रातील ३०.५८ कोटी कामगार नोंदणीकृत आहे. असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना आर्थिक सुरक्षा देण्यासाठी सरकारने ही योजना सुरू केलेली आहेत. ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केलेल्या गीग कामगारांना अनेक फायदे मिळत आहेत.
नोंदणी असलेल्या कार्डधारकाचा मृत्यू झाल्यास, कुटुंबाला २ लाखांपर्यंतची आर्थिक मदत दिलेली जाते. जर तुम्ही अपघातात अपंग झालात तर तुम्हाला १ लाखांपर्यंत मदत मिळते. ई-श्रम पोर्टलवर नोंदणी ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही प्रकारे करता येते.
ऑनलाइन नोंदणी कशी करावी ?
- eshram.gov.in या वेबसाइटवर जावे.
- Register on eShram बटणावर क्लिक करायचे.
- आधारशी लिंक केलेला मोबाईल नंबर आणि कॅप्चा कोड टाकावे.
- तुम्ही EPFO किंवा ESIC सदस्य आहात की नाही या प्रश्नाचे उत्तर द्यावे.
- Send OTP वर क्लिक करा आणि मोबाईलवर मिळालेला OTP टाकावे.
- त्यानंतर तुमचा १४ अंकी आधार क्रमांक टाका आणि T&C वर टिक करायचे.
- सबमिट वर क्लिक केल्यानंतर एक नवीन फॉर्म उघडेल.
- त्यात तुमची जन्म तारीख, पत्ता, शिक्षण आणि बँक माहिती भरावी.
- सर्व माहिती काळजीपूर्वक तपासा आणि संमतीवर टिक करून सबमिट करावे.
- तुमची नोंदणी पूर्ण होईल. तुम्ही ते डाउनलोड करून प्रिंटआउट देखील घेऊ शकतात.
योजनेच्या अधिक माहितीसाठी PDF पाहण्यासाठी :- https://eshram.gov.in/