Guardian Ministers In Maharashtra ; फडणवीस सरकारने संपूर्ण 37 पालकमंत्र्यांची यादी जाहीर केलेली आहेत. नवीन सरकारमध्ये पालकमंत्र्यांची मोठी फेरबदल करून काही मंत्र्यांना वगळण्यात आलेले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असतील तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे बीड आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री असतील आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाणे आणि मुंबई शहर या जिल्ह्याचे पालकमंत्री असणार आहेत. तुमच्या जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री कोण आहेत, पाहुया संपूर्ण जिल्ह्याची यादी आपण खाली दिलेली आहे तेथे सविस्तर पाहू शकता.
महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्याची पालकमंत्र्यांची यादी पहा..
- 1) गडचिरोली – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
- 2) ठाणे – एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
- 3) मुंबई शहर – एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
- 4) पुणे – अजित पवार, उपमुख्यमंत्री
- 5) बीड – अजित पवार, उपमुख्यमंत्री
- 6) नागपूर – चंद्रशेखर बावनकुळे
- 7) अमरावती – चंद्रशेखर बावनकुळे
- 8) अहिल्यानगर – राधाकृष्ण विखे पाटील
- 9) वाशिम – हसन मुश्रीफ
- 10) सांगली – चंद्रकांत पाटील
- 11) नाशिक – गिरीश महाजन
- 12) पालघर – गणेश नाईक
- 13) जळगाव – गुलाबराव पाटील
- 14) यवतमाळ – संजय राठोड
- 15) मुंबई उपनगर – आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा (सह-पालकमंत्री)
- 16) रत्नागिरी – उदय सामंत
- 17) धुळे – जयकुमार रावल
- 18) जालना – पंकजा मुंडे
- 19) नांदेड – अतुल सावे
- 20 ) चंद्रपूर – अशोक उईके
- 21) सातारा – शंभुराज देसाई
- 22) रायगड – आदिती तटकरे
- 23) लातूर – शिवेंद्रसिंह भोसले
- 24) नंदूरबार – माणिकराव कोकाटे
- 25) सोलापूर – जयकुमार गोरे
- 26) हिंगोली – नरहरी झिरवळ
- 27) भंडारा – संजय सावकारे
- 28) छत्रपती संभाजी नगर – संजय शिरसाट
- 29) धाराशिव – प्रताप सरनाईक
- 30) बुलढाणा – मकरंद जाधव
- 31) सिंधुदुर्ग – नितेश राणे
- 32) अकोला – आकाश फुंडकर
- 33) गोंदिया – बाबासाहेब पाटील
- 34) कोल्हापूर – प्रकाश आबिटकर, माधुरी मिसाळ (सह पालकमंत्री)
- 35) गडचिरोली – आशिष जैस्वाल (सह पालकमंत्री)
- 36) वर्धा – पंकज भोयर
- 37) परभणी – मेघना बोर्डीकर
पालकमंत्र्यांचे अधिकार आणि कामे काय असतात
अजित पवारांचा धनंजय मुंडेंना धक्का; पालकमंत्री पदही नाही, भाजपचंही टेंशन वाढलं
मुख्यमंत्री जसे राज्याचे प्रमुख असतात तसेच पालकमंत्री जिल्ह्याचे प्रमुख या नात्याने काम पाहतात. पालकमंत्री जिल्ह्यातील प्रशासकीय आणि राजकीय नियंत्रण ठेवत असतात. राज्य सरकार, लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासन यांच्यातील दुवा म्हणून पालकमंत्री काम करतात. तसेच जिल्ह्याच्या विकासासाठी लागणारा निधी वितरित करण्याचा सर्वात महत्त्वाचा अधिकार पालकमंत्र्याकडे देण्यात आलेला असतो . आमदार, खासदार यांनी मागणी केलेल्या कामांना मंजुरीचे अधिकारही पालकमंत्री यांच्याकडेच असतात.