NSMNY update ; पिएम किसान योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता कधी येणार याबाबत शेतकऱ्यांना उत्सुकता लागलेली आहेत. नमो शेतकरी योजनेत आतापर्यंत पीएम किसान योजनेप्रमाणे दरवर्षी 6,000 रूपये दिले जातात. नमोचा पुढील हप्ता कधी येणार तसेच किती रूपयाचा येणार याबाबत माहिती पाहुयात.
नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता 3000 रूपये येणार काय?
विधानसभा निवडणुकीतील जाहीरनाम्यात महायुती सरकारने नमो शेतकरी योजनेत बदल केला जाणार असे सांगितलेले होते. दरवर्षी 6,000 रूपयावरून आता दरवर्षी 9,000 रूपये दिले जाणार असल्याची घोषणा महायुती सरकारने केलेली होती. आता महायुती सरकार निवडून आले आहेत. तरी नमो शेतकरी योजनेत बदल होऊन दरवर्षी 9000 रूपये मिळतील अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहेत.
लाडकी बहीण योजना : सर्वात मोठी कारवाई, 5 लाख महिलांची नावं वगळली!
येत्या अर्थसंकल्पात नमो शेतकरी योजनेत काही बदल करून रक्कम वाढवण्याबाबत तरतूद केली जाणार अशी शक्यता आहे. अर्थसंकल्प सादर झाल्यावर योजनेची रक्कम वाढवली का हे स्पष्ट होणार आहे.
नमोचा पुढील हप्ता कधी येणार?
नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता पीएम किसान योजनेच्या 19 व्या हप्त्यासोबत येण्याची शक्यता करण्यात आलेली आहे. त्याबद्दल मुख्यमंत्री, कृषीमंत्री अधिकृत घोषणा करतील नंतर नमोचा हप्ता वितरण होणार आहे नमोचा पुढील हप्ता कधी येणार याबाबत अजून सरकारकडून अधिकृत माहिती दिली नाहीत.