केंद्र सरकारच्या ‘पंतप्रधान किसान सन्मान योजने’चा १९ वा हप्ता २४ फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला. या योजनेअंतर्गत राज्यातील ९२.८८ लाख शेतकऱ्यांना प्रत्येकी 2,000 रुपये मिळालेले आहे.
या हप्त्यासाठी एकूण १,९६७ कोटी रुपये वितरित करण्यात आलेले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारच्या भागलपूर येथे हा हप्ता जाहीर केलेला आहेत, तर महाराष्ट्रात साताऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडलेला आहेत.
मंत्रिमंडळ बैठकीमध्ये लवकरच नमो शेतकरी योजनेचा सहाव्या हप्ता विषयी निर्णय होणार आहे. अशा प्रकारची माहिती सध्या प्रसार माध्यमांसरलेली पाहायला मिळत आहे.
नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता दोन हजार रुपये अजूनही शेतकऱ्यांना मिळाला नसला तरी देखील हप्ता रक्कम वाढणार आहे अशा प्रकारचे चर्चा देखील होत आहे. त्यामुळे शासन स्तरावर निर्णय होईल का पहावे लागेल.
विधानसभा निवडणुकीपूर्वी या योजनेचा पाचवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. त्यामुळे या वेळी शेतकऱ्यांना फक्त केंद्र सरकारचा हप्ता मिळणार असून, राज्य सरकारच्या हप्त्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.