Panjabrao dakh live यंदाच्या दिवाळीच्या आनंदावर विरजण पडणार असे दिसते. खरे तर सध्या दीपोत्सवाचा आनंदोत्सव सर्वत्र मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. पण, याच दिवाळी पाडव्याच्या दिवशी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे.
पंजाबराव डख यांनी नवे भाकीत केले आहे. त्यात पंजाब राव यांनी नोव्हेंबर महिन्याची सुरुवातही पावसाने होईल, असा अंदाज व्यक्त केला. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पंजाब राव यांनी 1 नोव्हेंबरपासून मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र विभागातील जवळपास दहा जिल्ह्यांमध्ये पाऊस सुरू होणार असल्याचे सांगितले असून पुढील दोन दिवस अर्थातच 3 नोव्हेंबरपर्यंत या भागात पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा दावा त्यांनी केला आहे. शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज लक्षात घेऊन शेतीच्या कामांचे नियोजन करावे.Panjabrao dakh live
महाराष्ट्रावर दिवाळीनंतरही अवकाळी पावसाच संकट राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता
महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात पावसाची हजेरी?
पंजाब राव यांच्या मते, राज्यात १ नोव्हेंबर ते ३ नोव्हेंबर या कालावधीत मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. या कालावधीत मराठवाडा विभागातील बीड, धाराशिव, नांदेड, लातूर परभणी या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
अर्थात मराठवाड्यातील या पाच जिल्ह्यांत पावसाचे प्रमाण फारसे असणार नाही. या भागात ढगाळ वातावरणासह पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या पाच जिल्ह्यांमध्ये १ नोव्हेंबर ते ३ नोव्हेंबर या कालावधीत मराठवाड्यातील जिल्ह्यांपेक्षा जास्त पाऊस पडेल, असा अंदाज आहे.
या पार्श्वभूमीवर मध्य महाराष्ट्रातील या पाच जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी आपल्या शेतीविषयक कामांचे नियोजन करताना विशेष काळजी घ्यावी, असे सांगण्यात आले आहे. दरम्यान, ३ नोव्हेंबरनंतर महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण हळूहळू कमी होईल.
तसेच, 5 नोव्हेंबरपर्यंत मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील या जिल्ह्यात हवामान प्रामुख्याने कोरडे राहील. 5 नोव्हेंबरपासून महाराष्ट्रात थंडीची चाहूल लागण्याची शक्यता पंजाब राव यांनी वर्तवली आहे.Panjabrao dakh live