PM Kisan Yojana: शेतकऱ्यांना मोदी देणार मोठी भेट, पीएम किसान योजनेच्या 18वा हप्त्याची तारीख जाहीर

PM Kisan Yojana: सणापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी ९.५ कोटी शेतकऱ्यांना मोठी भेट देणार आहेत. 5 ऑक्टोबर 2024 रोजी पंतप्रधान मोदी वाशिम येथे बटण दाबताच 9.5 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा 18 वा हप्ता जमा करतील. मोदी सरकार सलग तिसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर 18 जून 2024 रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 17 वा हप्ता जमा करण्यात आला.

येत्या काही दिवसांत महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होणार आहेत आणि 5 ऑक्टोबर 2024 रोजी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत 9.5 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपये जमा केले जातील, त्याच दिवशी हरियाणामध्येही विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.

शेतकऱ्यांना आतापर्यंत ३.२५ लाख कोटी रुपये मिळाले आहेत PM Kisan Yojana

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही जगातील सर्वात मोठ्या थेट हस्तांतरण योजनांपैकी एक आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना मोदी सरकारने ही योजना सुरू केली होती.

पीएम किसान योजनेंतर्गत, एका वर्षात तीन हप्त्यांमध्ये 6000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केले जातात. जेणेकरून त्यांना महागडे बी-बियाणे आणि खतांपासून दिलासा मिळेल. 17 हप्त्यांमध्ये आतापर्यंत पीएम किसान योजनेंतर्गत 9.25 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 3.25 लाख कोटी रुपये हे हस्तांतरित केली आहेत.PM Kisan Yojana

पीएम किसान नोंदणीसाठी eKYC आवश्यक आहे

पीएम किसानच्या सरकारच्या अधिकृत वेबसाइटनुसार, नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी ई-केवायसी असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. OTP बेस्ट ई-केवायसी PMKisan पोर्टलवर उपलब्ध आहे. याशिवाय, बायोमेट्रिक आधारित ई-केवायसीसाठी जवळच्या CSC केंद्रांशी संपर्क साधता येईल.PM Kisan Yojana

पैसे हे तुमच्या खात्यात आले आहेत की नाही हे कसे चेक करायचं? PM Kisan Yojana

  • जे शेतकरी प्रधानमंत्री किसान योजनेचे लाभार्थी आहेत त्यांनी प्रथम https://pmkisan.gov.in/ वर जा.
  • मुख्यपृष्ठावरील संबंधित लिंकवर क्लिक करा आणि तुमचा नोंदणी क्रमांक किंवा आधार क्रमांक प्रविष्ट करा.
  • नंतर कॅप्चा प्रविष्ट करा.
  • त्यानंतर Get Status वर क्लिक करा.
  • यानंतर, हप्त्याशी संबंधित माहिती स्क्रीनवर दिसेल.
  • मोबाईल ॲपद्वारे शेतकरी त्यांच्या पेमेंटची स्थिती तपासू शकतात.PM Kisan Yojana

Leave a Comment

Close Visit Marathinews360