PM Kisan Yojana 19 th Installment Date: केंद्र सरकारने 2019 पासून पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू केलेली आहेत. या योजनेअंतर्गत खातेदार शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रूपये तीन टप्प्यात दिले जातात. चार महिन्याच्या फरकाने 2,000 रूपये DBT द्वारे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जात आहेत. आतापर्यंत या योजनेचे 18 हप्ते शेतकऱ्यांना वाटप करण्यात आलेले आहेत. आता शेतकऱ्यांना पुढील हप्त्याची प्रतीक्षा लागलेली आहेत.
हे काम करा
पिएम किसान योजनेतून बोगस लाभार्थी बाहेर काढण्यासाठी ई-केवायसी करणे अनिवार्य केलेले आहेत. ज्या शेतकऱ्यांनी ईकेवायसी केली नाही अशा शेतकऱ्यांचे पुढील हप्ते बंद होणार आहेत. पिएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी ईकेवायसी, बॅंक खात्याला आधार लिंक, आधार सिडींग स्टेट्स ॲक्टिव्ह असने आवश्यक आहे.
पिएम किसान योजनेचा पुढील हप्ता 24 फेब्रुवारीला शेतकऱ्यांना मिळणार आहे बिहारमधील कार्यक्रमात केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी 19 व्या हप्त्याची तारीख सांगितली आहेत. कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सांगितले की ईकेवायसी, बॅंक खात्याला आधार लिंक, आधार सिडींग स्टेट्स ॲक्टिव्ह यापैकी काही अपुर्ण असेल तर लवकर पूर्ण करून घ्यावेत.
- पिएम किसान योजनेचे आपले स्टेट्स चेक करण्यासाठी pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन होमपेज वरील फार्मर कॉर्नर या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर स्टेटस समजून घ्या वर क्लिक करायचे.
- त्यामध्ये रजिस्ट्रेशन नंबर आणि कॅपचा टाकावे.
- गेट ओटीपीवर क्लिक करून तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी टाकावे.
- त्यानंतर तुम्हाला पीएम किसानच्या हप्त्याचा मागील तपशील पाहता येतील.