Ramchandra Sable Hawaman: जेष्ठ हवामान तज्ञ रामचंद्र साबळे यांनी यंदाचा उन्हाळा कसा जाणार आहेत याबाबत दि. 17 फेब्रुवारी रोजी अंदाज वर्तविण्यात आलेला आहेत. साबळे यांनी सांगितले आहेत की, हवेत co2 चे प्रमाण 0.01 टक्क्यांनी वाढलेले आहेत. त्यामुळे यंदाचा उन्हाळा अतिशय कडक जाणार असून त्याची चाहुल फेब्रुवारी मध्येच जाणवू लागलेली आहेत. यंदा तापमान गेल्या वर्षी च्या तुलनेत 1 ते 2 अंशांनी वाढण्याची शक्यता आहेत.
वृक्षतोड, औद्योगिकीकरण, इंधन ज्वलनाने हवेत कार्बन डायॉक्साईडचे प्रमाण खुप वाढलेले आहेत. यंदा उन्हाळा अधिक तापणार असुन फेब्रुवारी मध्ये तापमान 37 अंशावर पोहोचलेले आहे. वातावरणात झालेल्या एकंदरीत बदलांमुळे हवेत co2 चे प्रमाण 0.01 % एवढे वाढले असून यंदा मे महिन्यात तापमान 45+ असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहेत. हे तापमान मागच्या चार वर्षांच्या उच्चांकी असेल असेही साबळे यांनी सांगितलेले आहे.

यंदा सरासरीच्या तापमानात 1.5 टक्के एवढी वाढ झालेली असून मागिल तीन वर्षांतील फेब्रुवारी चे तापमान सर्वाधिक आहेत. यंदा एप्रिल मे मध्ये राज्यातील सर्वाधिक तापमान 45+ एवढे जाण्याची शक्यता आहेत. (जेष्ठ हवामान तज्ञ रामचंद्र साबळे)
साबळे यांनी वाढत्या तापमानावर चिंता व्यक्त केलेली असून वृक्ष लागवड वाढुन वृक्ष संगोपन करण्यावर भर देणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटलेले आहेत.