Ration Card | रेशन कार्ड वर आता मिळणार नाही गहू, E-KYC करण्याच्या तारखे मध्ये वाढ

Ration Card आपले राज्य सरकार आणि केंद्र सरकार सर्वसामान्यांसाठी विविध योजना आणत आहे. त्याचा फायदा अनेक नागरिकांना होतो. सरकारने गरीब नागरिकांसाठी रेशन कार्ड योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत शिधापत्रिकाधारकांना स्वस्त दरात धान्य मिळते. तसेच इतर अनेक गोष्टी उपलब्ध होत्या. मात्र आता सोयगाव तालुक्यातील शिधापत्रिकांना दिवाळीला रेशन मिळणार होते. त्यात एक बदल करण्यात आला आहे. आता या रेशनधारकांना कमी गहू देण्यात येणार असून त्याऐवजी नागरिकांना ज्वारी दिली जाणार आहे. सोयगाव तालुक्यातील नागरिकांची सुमारे एक हजार क्विंटल ज्वारीची आवक झाली आहे. .आणि ते तालुक्यातील लोकांना वितरीत केले जाईल.या रेशन दुकानात २४ हजार शिधापत्रिकाधारक आहेत.

Ration Card

मात्र आता ते 6 किलोने कमी होणार आहे. आणि 9 किलो गहू आणि 6 किलो ज्वारी नागरिकांना देण्यात येणार आहे. शिधापत्रिकाधारकांनाही तांदूळ दिला जातो. मात्र या तांदळात कोणतीही घट झालेली नाही. शिधापत्रिकाधारकांना 7 किलो तांदूळ आणि अन्न सुरक्षा योजना कार्डधारकांना 4 किलो तांदूळ देण्यात येणार आहे. शासनाच्या या योजनेचा आतापर्यंत राज्यातील अनेक नागरिकांना लाभ झाला आहे.

या रेशन कार्ड नागरिकांना मिळणार दिवाळीनिमित्त या 4 वस्तू मोफत Ration card Diwali

यापूर्वी सरकारने शिधापत्रिकाधारकांना केवायसी पूर्ण करण्यास सांगितले होते. सुरुवातीला केवायसीसाठी ३१ सप्टेंबर ही अंतिम तारीख देण्यात आली होती. मात्र अनेक नागरिकांनी हे केवायसी केलेले नाही. त्यामुळे सरकारने ही तारीख ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवली. पण तरीही अनेकांनी ई केवायसी पूर्ण केलेले नाही. त्यामुळे सरकारने केवायसी प्रक्रियेला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. ३१ डिसेंबरपर्यंत कोणत्याही नागरिकाने केवायसी न केल्यास त्याला रेशन मिळणार नाही, असेही सांगण्यात येत आहे. त्यामुळे जर तुम्ही तुमच्या रेशन कार्डचे KYC केले नसेल तर ते लवकरात लवकर करा.

Leave a Comment

Close Visit Marathinews360