खुशखबर! मोफत गॅस सिलेंडर महिलांना देण्यास सुरुवात, तुम्हालाही मिळाले का अनुदान? पहा येथे

राज्य सरकारने महिलांसाठी सुरू केलेली मुख्यमंत्री लाडकी योजना सुपरहिट ठरली असून या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 हजार दिले जात आहेत. आतापर्यंत या योजनेच्या पाच हप्त्यांचे 7500 हजार रुपये पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. आता यासोबतच या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेंतर्गत तीन गॅस सिलिंडर मोफत मिळणार आहेत.

महाराष्ट्र सरकारच्या या योजनेंतर्गत महिलांना वर्षभरात तीन सिलिंडर मोफत दिले जाणार आहेत. हे मोफत सिलिंडर वितरण आता सुरू झाले आहे. मेसेज मिळाल्यानंतरच पात्र महिलांना मोफत सिलिंडर मिळेल. या योजनेअंतर्गत ज्या महिलांना मेसेज मिळालेला नाही, त्यांनी काय करावे हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

महाराष्ट्र सरकारने महिलांना तीन गॅस सिलिंडर मोफत देण्याची घोषणा केली होती. आतापर्यंत ज्या महिलांना मोफत गॅस सिलिंडर मिळालेले नाहीत. त्यांना आता गॅस सिलिंडर दिले जाणार आहेत. गॅस सिलिंडर वितरण प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. महिलांना आधी गॅस सिलिंडर घ्यावा लागतो. त्यानंतर गॅस सिलिंडरची रक्कम महिलांच्या खात्यात जमा केली जाईल.

महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेंतर्गत ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मोफत गॅस सिलिंडरचा हप्ता जमा केला आहे. ज्या महिलांना अद्याप या योजनेत पैसे मिळालेले नाहीत. त्यांनी गॅस एजन्सीमध्ये जाऊन E KYC करून घेणे आवश्यक आहे. त्यानंतरच तुम्हाला गॅस सिलिंडरचे पैसे मिळतील.

Leave a Comment

Close Visit Marathinews360