Ladki Bahin Yojana New Rule: जुलै 2024 मध्ये राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरू केली. या योजनेद्वारे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असलेल्या महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जात आहे. परंतु या योजनेत आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या तसेच वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असलेल्या महिलांनी सुद्धा अर्ज केले असून त्यांना सुद्धा योजनेचा लाभ मिळाला आहे. खोटी माहिती देऊन योजनेचा लाभ घेतलेल्या महिलांकडून योजनेचे पैसे परत घेतले जाणार असल्याचे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले आहे.
उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी लाडक्या बहिणींना अवाहन केले आहे की ज्या महिला आर्थिकदृष्टया सक्षम आहे आणि ज्यांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे अशा महिलांनी स्वतः योजनेतून बाहेर पडावे.
ज्या महिला स्वतः योजनेतून बाहेर पडणार आहेत अशा महिलांकडून वसुली होणार नाहीत, आतापर्यंत 4,500 महिलांनी योजनेतून आपले अर्ज मागे घेतलेले आहेत. लाडक्या बहिणीचे अर्ज तपासणी सुरू असुन ज्या महिला चुकीच्या पद्धतीने योजनेचा लाभ घेत असतील अशा महिलांचे अर्ज रद्द करून त्यांचे पैसे सरकारी तिजोरीत परत करण्यात येणार आहेत.
लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, अजितदादांची मोठी घोषणा
अर्थ नियोजन विभागाशी आमचा संपर्क चालू आहेत. या विभागाच्या माध्यमातून रिफंड हेड ऑफ तयार करून देणार आहेत. त्या माध्यमातून हे पैसे राज्याच्या तिजोरीत येतीन. हे पैसे लोकोपयोगी, लोककल्याणकारी कामांसाठी, योजनांसाठी वापरले जाणार आहे. इतर योजनांमध्ये जशी रुटीन रिफंड सिस्टीम असते तशीच प्रणाली इथे देखील सुरू होणार आहे.