‘लाडक्या’ बहिणीकडून 1500 वसूल करणार? लाडक्या बहिणींना अजित दादांचा मोठा धक्का, VIDEO पहा

Ladki Bahin Yojana Update : लाडकी बहिण योजनेचा लाभ काही आयकरदात्या महिलाही घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यावरुन अर्थमंत्र्यांनी स्वत:हून योजनेचा लाभ सोडण्याचं आवाहन श्रीमंत बहिणींना केलं आहे. पाहूया एक खास रिपोर्ट.

Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजनेमुळे सत्तेत आलेल्या महायुती सरकारसमोर आता ही योजना पुढे सुरु ठेवण्यासाठी कसरत सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. 1500 रुपयांवरुन 2100 रुपये कधी मिळणार याची उत्सुकता असतानाच लाभार्थी महिलांचं टेन्शन वाढवणारी बातमी आलेली आहेत. ज्यांनी चुकीचा पद्धतीनं योजनेचा लाभ घेतलाय त्यांच्याकडून पैसे वसूल होणार असे संकेत मिळत आहेत. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी जालन्यात बोलताना लाडक्या बहि‍णींना धक्का दिलेला आहे. गरज नसणाऱ्यांना या योजनेचे पैसे मिळणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केलेले आहेत. इन्कम टॅक्स भरणाऱ्या महिलांनीही या योजनेचा लाभ घेतलेला. त्यामुळे श्रीमंत बहिणींनी योजनेचा लाभ सोडावा असं आवाहन अर्थमंत्र्यांनी केलं आहे.

या योजनेचे 2 कोटी 34 लाख लाभार्थी आहे. या योजनेचा सहावा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात 24 डिसेंबरपासून वर्ग झालेला. आता सातवा हफ्ता 26 जानेवारीपासून मिळणार आहेत. अर्थमंत्र्यांच्या आवाहनाच्या पार्श्वभूमिवर या योजनेचे महत्वाचे निकष कोणते आहेत ते पाहूयात…

लाडकीसाठी पात्रतेचे निकष

  • वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त नसावेत
  • कुटुंबातील सदस्य सरकारी कर्मचारी नसावेत
  • कुटुंबातील सदस्य आयकरदाता नसावेत
  • ट्रॅक्टर सोडून इतर चारचाकी वाहन नसावेत

अर्जांची फेर पडताळणी करुन चुकीचा लाभ घेतलेल्यांना माहिती देऊ, असं महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरेंनी म्हटलं आहेत.

आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर सरकारला लाडक्या बहिणींना नाराज करायचे नाहीत. त्यामुळे सरकार सावध भूमिका घेऊन आवाहन करतं आहे महाराष्ट्रातील सर्व पात्र महिलांना आणि मुलींना स्वावलंबी करण्याचं सरकारचं ध्येय आहेत. मात्र यापुढे गरजवंतांनाच या योजनेचे पैसे मिळणार आहे. तिजोरीत खडखडाट असताना मोठा आर्थिक भार असलेली ही योजना राबवताना तसेच पुढे 2,100 रुपये देताना सरकारची दमछाक होणार आहेत. एव्हढं मात्र निश्चितच आहे.

Leave a Comment

Close Visit Marathinews360