Namo shetkari & Pm kisan Yojana Installment: केंद्र सरकारने 2019 पासून पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू केलेली आहेत. या योजनेअंतर्गत खातेदार शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रूपये तीन टप्प्यात दिले जात आहेत. चार महिन्याच्या फरकाने 2,000 रूपये DBT द्वारे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जात आहे. आतापर्यंत या योजनेचे 18 हप्ते शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले आहेत. आता शेतकऱ्यांना पुढील हप्त्याची प्रतीक्षा लागलेली आहे.
पिएम किसान योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारने नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना सुरू केलेली आहे. या योजनेत शेतकऱ्यांना आतापर्यंत पाच हप्ते मिळालेले आहेत. राज्य सरकार येत्या अर्थसंकल्पात नमो शेतकरी योजनेत मोठे बदल करणार असून आता शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे वार्षिक 12,000 रुपये मिळणार आहेत.
लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, अजितदादांची मोठी घोषणा
पिएम किसान योजनेतून बोगस लाभार्थी बाहेर काढण्यासाठी ईकेवायसी करणे अनिवार्य केलेली आहेत. ज्या शेतकऱ्यांनी ईकेवायसी केली नाहींतअशा शेतकऱ्यांचे पुढील हप्ते बंद होणार आहे. पिएम किसान आणि नमो शेतकरी या दोन्ही योजनेचा लाभ घेण्यासाठी ईकेवायसी, बॅंक खात्याला आधार लिंक, आधार सिडींग स्टेट्स ॲक्टिव्ह असने आवश्यक आहेत.
पिएम किसान योजनेचा पुढील हप्ता 25/जानेवारी नंतर शेतकऱ्यांना मिळणार आहे. पात्र शेतकऱ्यांची माहिती 19 जानेवारी पर्यंत मागविण्यात आली होती. पिएम किसान योजनेचा 19 वा हप्ता मिळाल्यानंतर फेब्रुवारीत राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता वितरीत होईल असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे.