लाडकी बहिण योजना ; 1500 रुपये मिळाले नाही काय करावे – मंत्री आदिती तटकरे…

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेल्या 8 महिन्यापासून सर्वाधिक लोकप्रिय तसेच चर्चेचा विषय झालेली आहेत. योजनेच्या घोषणेनंतर सर्व महिलांमध्ये लाडकी बहिण योजनेची चर्चा सुरू झाली त्यानंतर योजनेसाठी अर्ज करण्यासाठी कागदपत्रांची जमवाजमव तसेच अर्ज करण्यासाठी महिलांच्या लांब लांब रांगा पहायला मिळाल्या होत्या.

कागदपत्रे आणि योजनेसाठी अर्ज करण्यासाठी शासनाने सुधारित शासन निर्णय (GR) काढून अनेक सुटी सवलती जाहीर केलेली होती. तसेच योजनेत तीन चार वेळा महत्त्वाचे बदल केलेले आहेत. योजनेत बरेचसे बदल झाल्यानंतर महिलांना लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज करता आलेले. महिला व बाल विकास मंत्री यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत पात्र महिलांना अर्ज मंजूर होऊन त्यांना 10,500 रूपयाचा लाभ सुद्धा मिळाला आहेत. (महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे)

दि. 24 जानेवारी पासून लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली होती. 26 जानेवारी पर्यंत लाभार्थी महिलांच्या खात्यात 1500 रूपये झालेले आहेत. योजनेत अनेक महिलांचे अर्ज मंजूर असताना सुद्धा महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळाला नाहीत. तरी याचे काय कारणे आहे तसेच योजनेचा लाभ मिळाला नसल्यास महिलांनी काय करावेत ते पाहुया. (Ladki bahin yojna 2025)

free scooty scheme 19
मुलींसाठी फ्री स्कुटी योजना नेमकी आहे काय? पहा संपूर्ण सविस्तर माहिती free scooty scheme 19

लाडकी बहिण योजनेचा अर्ज मंजूर असून पैसे का आले नाही…

1) लाडकी बहिण योजनेचा अर्ज मंजूर आहे तरीसुद्धा पैसे न मिळण्याचे पहिले कारण आहे की तुमच्या बॅंकेला आधार लिंक केलेले नसेल.

2) तसेच आधार लिंक आहे परंतु आधार सिडिंग स्टेट्स ॲक्टिव नसल्याने सुद्धा अर्ज मंजूर असून लाडकी बहिण योजनेचे पैसे येणार नाहीत.

3) बॅंक खात्याच्या संबंधित इतर कारणास्तव बॅंक खाते होल्ड होणे किंवा ईकेवायसी करावी लागत असेल किंवा कर्ज खाते असल्यास रक्कम कर्जातून कपात केलेली असण्याची शक्यता आहेत.

लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, अजितदादांची मोठी घोषणा

Bank Update
RBI ने देशातील सर्वात मोठी बँक SBI वर मोठा दंड ठोठावला आहे, ग्राहकांवर काय परिणाम होईल. संपूर्ण माहिती जाणून घ्या Bank Update

4) अनेक महिलांना आधार लिंक बॅंक खात्यात लाडकी बहिण योजनेचे पैसे जमा झाले आहे. आणि महिला अर्ज करतेवेळी दिलेल्या बॅंक खात्यात पैसे जमा झालेले आहे का? चेक करत आहेत तरी तुमच्या बॅंक खात्याशी कोणती बॅंक लिंक आहे चेक करावे.

5) अनेक महिलांचे दोन किंवा तीन बॅंकेत खाते आहेत ज्या बॅंकेला आधार लिंक आहेत त्या बॅंकेत पैसे जमा झाले आहेत का चेक करायचे आहे.

लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी महिलांनी काय करावे ते पहा.

1) आधार सिडिंग स्टेट्स ॲक्टिव आहे का? चेक करायचे आहे.
2) आधार सिडिंग स्टेट्स कोणत्या बँकेचे लिंक आहे चेक करायला पाहिजे.
3) बॅकेचे इतर काही अडचणी असल्यास दुरुस्ती करावीत.

Leave a Comment